इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे,आमदार प्रकाश आवाडे आणि युवा महाराष्ट्र सॅम उर्फ सचिन आठवले या तिघांचे पाच अर्ज दाखल झाले आहेत. तर दिवसभरात बारा जणांनी 25 नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल
