उरूणमध्ये मारुती मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पहिल्याच दिवशी अकरा लाखांची मदत

उरुण आणि परिसरातील हजारो लोकांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन असलेले श्री मारुती मंदिराचा जिर्णोद्धार भक्तांच्या लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय झालेला आहे आणि पहिल्याच दिवशी तब्बल रक्कम रुपये 11 लाख रुपये इतकी वर्गणी देखील जमा झालेली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्री मारुती मंदिराचा जिर्णोद्धार होणार असल्याने उरण आणि परिसरातील भक्तगणातून समाधान व्यक्त होत आहे.

वर्गणी जमा होताच मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामास सुरुवात झाली. सदरची रक्कम ही विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे. पुढील कामांसाठी भाविकांनी सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. उरण परिसरातील श्रद्धास्थान असलेले पुरातन मारुतीच्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी नागरिकांचे एकमत झाले आणि लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरले.