इचलकरंजी येथे अशोक स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज १ एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षाप्रमाणे आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, वृक्षारोपण, अनाथ निराधार मुलांना भोजन देणे, गो शाळामध्ये चारा उपलब्ध देण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मंगळवारी, १ रोजी सकाळी ८.३० वाजता अरुण विद्या मंदिर येथे मुलांना खाऊ वाटप, सकाळी साडेनऊ वाजता कलानगर येथील गो शाळा येथे एक टेम्पो चारा वाटप, दुपारी १२ वाजता सुदर्शन कॉलनी पुजारी मळा येथे शिवम केसरवाणी ग्रुपतर्फे वृक्षारोपण व सरबत वाटप करण्यात येणार आहे.

अ. लाट येथील बालोद्यान अनाथाश्रम येथील मुलांना सायंकाळचे भोजन वाटप, शांतीनगर परिसर येथे प्रदीप माळगे ग्रुप कडून अशोक स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोईचे उद्घाटन व सरबत वाटप होईल. तसेच मोफत आयुष्यमान भारत व आभा कार्ड कॅम्प अतिक समडोळे ई-सेवा केंद्र येथे दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे. अशा विविध सामाजिक उपक्रमाने अशोक स्वामी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अशोक स्वामी मित्र मंडळ युवा मंचच्यावतीने देण्यात आली.