इस्लामपुरात दुचाकीस्वारांवर कारवाई

इस्लामपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने रविवारी दिवसभर कारवाईची मोहीम उघडत भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या पाच जणांविरुद्ध वाहतूक अधिनियमाखाली गुन्हे दाखल करत दणका दिला. इस्लामपूर-सांगली रस्त्यावरील कामेरीनाका परिसरात सचिन बजरंग अडसूळ (रा. किसाननगर), अमोल भानुदास पाटील (कामेरी), किरण नारायण कांबळे (शिवनगर) हे तिघे आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात आणि वेड्यावाकड्या चालवत असताना पोलिसांच्या हाती लागले. तर इस्लामपूर-बहे रस्त्यावरील मार्केट परिसरात उमेश रमेश खरात आणि बाळू बिरू राठोड (दोघे रा. इस्लामपूर) हेसुद्धा भरधाव वेगात चालवत असताना पोलिसांना सापडले. राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली.