इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेसाठीच राखीव आहे, तरीही भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या गटात उमेदवारीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. पाटील यांची उमेदवारी महायुतीतून निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
तर शिंदेसेने कडून गौरव नायकवडी यांची उमेदवारी निश्चित असल्याचे समर्थक सांगत आहेत. इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील यांची उमेदवारी निश्चितच आहे. त्यांच्या विरोधात निशिकांत ,पाटील गौरव नायकवडी, आनंदराव पवार आणि राहुल महाडिक आपल्या ताकदीने उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी करीत आहेत.
मतदारसंघ शिवसेनेसाठी असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही इस्लामपूर मतदारसंघावर दावा केला आहे. परंतु, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे तुल्यबळ नेतृत्व नाही. तरीही महायुतीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी अजित पवार यांच्या कोर्टात उमेदवारीचा चेंडू ढकलला आहे.
त्यामुळे निशिकांत पाटील हेच जयंत पाटील यांच्या विरोधात लढू शकतात, असा निकष माहितीत काढला जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. निशिकांत पाटील यांच्या समर्थकांत उमेदवारी संदर्भात चर्चांना उधान आले आहे.शिंदेसेनेचे गौरव नायकवडी हे उमेदवारीसाठी सक्रिय झाले आहेत.
याबाबतीत नायकवडी यांनी शिंदे सेनेचे खास. धैर्यशील माने यांच्याशी संपर्क देखील वाढविला आहे. इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेसाठीच आहे त्याला धैर्यशील माने यांनी नायकवडी यांना स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीची तयारी करा ,असे संकेत दिले आहेत.