भुजबळ यांचा आमदार जयंत पाटलांना कडक सल्ला…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेबाबत विधान केले होते. हे विधान महायुतीच्या नेत्यांना चांगलेच झो॑बले आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका घेण्यासाठी उत्पन्नाचे बनावट कागदपत्र दाखल केल्याने न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्याने कृषिमंत्री कोकाटे यांचे विधिमंडळाचे सदस्यत्व आणि मंत्रीपद दोन्हीही धोक्यात आले आहे. सबंध राज्यभरात हा चर्चेचा विषय आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कृषिमंत्री कोकाटे यांना गो॓जारण्याचा प्रयत्न केला. तीस वर्षांपूर्वीचे प्रकरण अचानक कसे सुनाव लिहिला आले. यामागे काहीतरी राजकारण असावे, असे पाटील म्हणाले होते. श्री पाटील यांनी महायुतीतील किंवा राज्य सरकारमधीलच कोणीतरी याबाबत पडद्यामागून सूत्रे हलवीत असावेत, अशी शंका व्यक्त केली होती. वीस वर्षांपूर्वी न्यायालयात असलेल्या प्रकरणाची सुनावणी मंत्रीपदी नियुक्ती झाल्यावरच कशी काय एव्हढ्या गतीने होते. त्यावर झटपट निकाल देखील लागतो. असा प्रश्न पाटील यांनी केला होता.

यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात नापसंती व्यक्त केली आहे. एखाद्या प्रकरणात राजकीय विधान करण्यापूर्वी विचारपूर्वक करावे काही ठोस माहिती हाती असेल तरच बोलावे, असे संकेत आहेत. हे संकेत मोडणे योग्य नाही. श्री. पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर राहतात. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून काही गोष्टी त्यांनी शिकल्या पाहिजेत. शरद पवार यांच्याबरोबर राहिल्यामुळे कुठल्या विषयावर केव्हा आणि काय बोलावे, हे संकेत जयंत पाटील यांनी पाळायला हवेत, असा टोमणा पाटील यांनी मारला.

श्री. पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. ते एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेले आहे. त्यामुळे मला काही गोष्टी समजतात. हवेत बाण मारण्याऐवजी जयंत पाटील यांच्याकडे काही ठोस पुरावे असल्यास ते त्यांनी सादर करावेत. विनाकारण राजकीय विधाने करणे अनुचित आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.