प्रत्येक सांगोलाकरांना हक्काचे घर, सांगोला भवन आणि हक्काचे कार्यालय उपलब्ध करून देण्याची दीपकआबांची ग्वाही!

पिढ्यान पिढ्या दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातुन पोटाची खळगी भरवण्यासाठी मुंबईची वाट धरणाऱ्या सांगोलकराना मुंबई आणि परिसरात सुमारे 100 एकरावर घरकुल योजना राबवून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या अडचणी व व्यथा मांडण्यासाठी 24 तास तत्पर असणारे कार्यालय आणि सांगोला तालुक्यातील विद्यार्थी ,तरुण तसेच अन्य नागरिकांसाठी नवी मुंबई परिसरात भव्य सांगोला भवन उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबंध्द असल्याचे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी दिले.

संपूर्ण सांगोला तालुक्यासह आता मुंबईस्थिती सांगोलकरांनी ही यंदाच्या निवडणुकीत कसल्याही परिस्थितीत दीपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्याचा निर्धार केला आहे. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर दीपक आबा साळुंखे पाटील यांनी धनगरी वैशात विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ द्यावी अशी विनंती धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोटे यांनी केली. यावर माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ होकार दर्शवुन वर्षांनुवर्षी प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाच्या मागण्यावर आवाज उठवणार असा शब्द दिला.