टेंभू योजना भूमिपूजनाच्यावेळी सुहासभैय्या बाबर अनिलभाऊंच्या आठवणीत झाले भावूक

दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे स्वप्न आज सत्यात उतरत आहे म्हणजेच टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन होत आहे.

त्यामुळे खानापूर आटपाडी या मतदारसंघात टेंभू योजनेच्या माध्यमातून जलक्रांती होणार आहे. यावेळी सुहासभैया बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोलाचे योगदान मिळाल्याबद्दल आभार मानले. यावेळेस सुहास भैया बाबर म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी अमलात आणलेली आहे ही योजना अगदी पूर्णत्वास आलेली आहे.

अनेक नेत्यांनी याबाबतीत वेगवेगळा विचार केला. परंतु या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात आल्यामुळे महिलांनी या पैशांचा वापर आपल्या आरोग्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी केल्यामुळे ही योजना सत्कारणी लागल्यामुळे सुहासभैया बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन होत असताना सुहास भैया बाबर यांचा कंठ दाटून आला.

ते म्हणाले की, अनिलभाऊंचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद एका डोळ्यात आहे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत कारण या योजनेसाठी ज्यांनी दिवस-रात्र काबाडकष्ट केले ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते अनिलभाऊ आज आपल्या सर्वांच्यामध्ये असायला हवे होते अशी खंत यावेळी सुहासभैया बाबर यांनी व्यक्त केली.