धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गुवाहटी गाठले होते. विशेष म्हणजे गुवाहटीतील निसर्ग सौंदर्याची त्यांना भुरळ पडल्याचंही त्यावेळी दिसून आलं.

शहाजी बापू यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता, त्यामध्ये तेथील निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना, काय झाडी, काय डोंगर, काय हाटील एकदम ओक्के… असा त्यांचा डायलॉग फेमस झाला. तर, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह सुरतकडे पहिलं पाऊल माझं पडलं होतं असंही शहाजी बापूंनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यामुळे, धर्मवीर 2 चित्रपटात शहाजी बापू यांचीही भूमिका दिसून येते. चित्रपटात अभिनेता आनंद इंगळे यांनी शहाजी बापूंची भूमिका केलीय.

शहाजी बापूंसारखी तब्येत, हलकीशी दाढी, थोडसं टक्कल आणि कपाळावर टीळा दिसून येतोय. त्यामुळे, धर्मवीर 2 सिनेमात शहाजी बापूंचा डिक्टो रोल साकारल्याचं दिसून येतंय. काय तो पेहराव, काय तो अभिनय, सगळंच एक नंबर…असे म्हणत नेटीझन्सकडून आनंद इंगळे यांनी साकारलेल्या शहाजी बापूंच्या भूमिकेचं स्वागत केलं जातंय.