जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीची जोरात तयारी केली आहे. याउलट महायुतीकडे उमेदवार कोण यावर आजही एकमत झाले नाही. इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेसाठीच असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार आणि हुतात्मा सकल सकुलांचे गौरव नायकवाडी यांनी वेळोवेळी केली . त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या विट्यातील कार्यक्रमावेळी भेट घेऊन आपला हक्क सांगितला.
याउलट भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कमळापेक्षा घड्याळ देऊन लढावे, अशा चर्चेला महायुती उधाण आले आहे .याबाबत निशिकांत पाटील यांनी सावध पवित्रा घेतला आहे. महायुती इस्लामपूर मतदार संघातील गुणवत्ता पाहूनच उमेदवारी देईल ,असे स्पष्ट केले आहे . आनंदराव पवार आणि गौरव नायकवडी यांनी इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेकडे राहण्यासाठी भेट घेतली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत इस्लामपूर ची जागा शिंदेसेनेला सुटणार असून, आम्ही उमेदवार असु,असा दावा पवार यांनी केला.