दारूला पैसे न दिल्याने सुनील रामा कुचकोरवी (वय ३५) याने आई यल्लाव्वा ऊर्फ गुणाबाई कुचकोरवी (वय ६३) यांचा गळा दाबून खून केला होता.आईला मारल्यानंतर तो खोलीतच बसून होता. या खोलीबाहेर आलेल्या रक्ताच्या थारोळ्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला पकडले असता एक विदारक चित्र समोर आले होते.
आईच्या (Mother) मृतदेहाचे तुकडे करून आरोपी सुनील कुचकोरवी खात असल्याचे आढळून आल्याने प्रत्यक्षदर्शी पोलिसांचाही थरकाप उडला होता. सुनील कुचकोरवी दारूच्या आहारी गेला होता. त्याच्या त्रासामुळे त्याची पत्नी चार मुलांसह माहेरी निघून गेली होती. पत्र्याच्या शेडमध्ये कुचकोरवी मायलेक राहत होते. आई यल्लव्वा त्याला काबाडकष्ट करून सांभाळण्यासह घरही चालवत होती.
घटनेच्या दिवशीही जेवणावरूनच आरोपी सुनीलने आईसोबत भांडण केले होते.जेवणाचे ताट भिरकावून त्याने थेट आईलाच संपविले.पण व्यसनी सुनीलने आईचा निर्घृण खून करावा अन् तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते भाजून खावे, हा अत्यंत घृणास्पद प्रकार २८ ऑगस्ट २०१७ रोजी कावळा नाक्याजवळील वसाहतीत घडला होता.