आटपाडीत उद्या कला मोहत्सवाचे आयोजन! नूतन खासदारांची असणार उपस्थिती….

आटपाडी तालुक्याचे युवानेते संभाजी पाटील युवा प्रतिष्ठानचे वतीने शनिवारी बचत भवनच्या मैदानावर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सांगली लोकसभेचे खासदार विशाल पाटील, आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती संभाजी पाटील यांनी दिली.

संभाजी पाटील म्हणाले आपल्या महाराष्ट्र मध्ये अनेक कलाकार आहेत. जे आपली संस्कृती टिकवण्यासाठी स्पष्ट घेतात . आटपाडी ही साहित्यिक पंढरी म्हणून ओळखली जाते. यांच्या या आटपाडीच्या मातीतून अनेक कलाकार जन्माला आले आहेत. अशा कलाकारांना एक वेगळी व्यासपीठ निर्माण करण्याचे उद्देशाने युवा मंच कार्य करत आहे. या कला महोत्सवामध्ये रेकॉर्ड स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये ग्रुप डान्स साठी, अकरा व सात हजाराच्या बक्षीस ठेवण्यात आली आहे, सोलो डान्स साठी सात, पाच व तीन हजार चे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ग्रुप नायकाला व उत्कृष्ट डान्सरला एक ग्राम चैन भेट देण्तात आहे. आटपाडी तालुक्यांमध्ये कला महोत्सवाचे प्रथमच होत असल्यामुळे नागरिकांना याचा आनंद घेता येणार आहे, असे संभाजी पाटील यांनी सांगितले