डॉ. अनिकेत देशमुख यांचा विश्वास! शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा…..

आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झालेली आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहेत.

अशातच सांगोला विधानसभा मतदारसंघात देखील चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळत आहे. सांगोला तालुक्यातील शेकाप हा महाविकास आघाडीत आहे. शेकापकडून डॉ. अनिकेत देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू बाबासाहेब देशमुख हे दोघे तयारी करत आहे. मागील निवडणुकीच्या पराभवानंतर अनिकेत देशमुख हे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी गेले होते. त्यामुळे त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क तुटला होता.

तर बाबासाहेब देशमुख यांनी बाजार समिती, खरेदी विक्री संघ बिनविरोध करत ते अॅक्टिव्ह राहिले आहेत. परंतु या दोघांमध्ये उमेदवारी कुणाला याचा डोकेदुखी मात्र शेकापसमोर राहणार आहे. अशातच शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत व्यक्त केलेली आहे.

डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले की, सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे. गेल्या 50 ते 55 वर्षातील सांगोला तालुक्यातील राजकारणाचा विचार करता आबासाहेबांनी सतत शेतकरी कामगार पक्षाचा विचार केला. त्यांच्या कामाची पद्धत ही सर्व सांगोला तालुक्यातील जनतेला माहीतच आहे.

तसेच 1900 निवडणूक याची जबाबदारी माझ्यावर सोपवली असता त्यावेळी मी राजकारणामध्ये नवखा असल्याने निसटता पराभव स्वीकारावा लागला. काही चुका घडल्या आणि त्यामुळे पराभवास सामोरे जावे लागले. परंतु येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष एकजुटीने काम करेल. पक्षाने मागच्या वेळेस आमच्यावर विश्वास दाखवला.

जनतेचा आक्रोश यावरती आबासाहेबांनी मोहर दाखवून माझ्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी अगदी काळजीपूर्वक सांभाळत आहे. त्यावरती प्रयत्न करत काम करीत आहे.त्यामुळे निश्चित पक्ष या सर्व गोष्टींचा विचार करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरती देतील. तसेच कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची काळजी पक्ष निश्चितच घेईल.