सध्या अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था पहायला मिळत आहे. यामुळे अपघातांमध्ये प्रचंड वाढ देखील होत आहे. अनेक भागातील रस्त्यांची दुरुस्तीचे काम देखील चालू आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथील पाणंद रस्ता तहसीलदार सागर ढवळे यांच्या आदेशाने शुक्रवारी खुला करण्यात आला. वर्षभरापासून या रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू होता. शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात रस्ता खुला केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी खरसुंडीचे मंडलाधिकारी देवानंद चव्हाण, आटपाडीचे मंडलाधिकारी संजय बोंगाळे, प्रशांत जाधव, सरपंच अंकुश पाटील, पोलिस पाटील जाई लोहार, महसूल सेवक गौरीहर लोहार उपस्थित होते. मुख्य रस्त्याला जोडणारा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता खुला करण्यात आला.
आटपाडी तालुक्यातील झरे येथील पाणंद रस्ता खुला, शेतकऱ्यांमधून समाधान
