इस्लामपुरात उद्या सर्वात मोठा महाहादगा आणि दांडिया…

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकमत’सखी मंच श्री गणेश नवरात्र उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक 5 रोजी दुपारी 2वाजता यल्लमा चौक येथे सर्वात मोठी महाहादगा ,दांडिया आणि वन मिनिट गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे. माहेर फार्मिंग ज्वेलर्स ,विशाल सूर्यवंशी, केदार पाटील कोकोस हॉटेल आणि प्रवीण ज्वेलर्स प्रायोजक आहेत. त्याचबरोबर खिरापत वाटप आणि प्रख्यात गायक प्रल्हाद पाटील यांच्या बहारदार कार्यक्रम आणि बक्षिसाची लयलूट असणार आहे. तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.