इस्लामपूर येथील राजारामबापू बँकेस ५० कोटींचा नफा; सभासदांना १२% लाभांश देण्याचा मानस

देशातील नागरी सहकारी बँकात २३ व्या क्रमांकावर वाटचाल करीत असलेल्या वाळवा तालुक्यातील पेठ येथील राजारामबापू सहकारी बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ठेवी, कर्जे वाटप, एकूण व्यवसाय, प्रतिसेवक व्यवसायात वाढ करीत ५० कोटी ७४ लाखाचा नफा मिळविला आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा आमचा मानस असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष विजयराव यादव, व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकनेते राजारामबापू पाटील यांनी १९८१ साली विविध घटकांना आर्थिक ताकद देण्यासाठी बँकेची स्थापना केली. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बँक संपूर्ण देशात यशस्वी वाटचाल करीत आहे. व्यावसायिक व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, काटकसर व पारदर्शी कारभार ही बलस्थाने आहेत. बँकेच्या वाटचालीत कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. कर्मचारी ग्राहकांना प्रामाणिक व चांगली सेवा देत आहेत. याप्रसंगी संचालक धनाजी पाटील, माणिक पाटील, डॉ. प्रकाश पाटील, संजय पाटील, अनिल गायकवाड, आर. एस. जाखले, अँड. संग्राम पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, आनंदराव लकेसर, जयकर गावडे, संभाजी पाटील, प्रशांत पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटील, राजेश पाटील, शहाजी माळी, सुस्मिता जाधव, कमल पाटील, सीए सुनील वैद्य, सीए उमाकांत कापसे, डॉ. सचिन पाटील, उपमुख्य व्यवस्थापकीय अधिकारी आर. ए. पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.