नवरात्र उत्सावात यंदा पाऊस असणार आहे. दोन दिवस पावसाची विश्रांती असून ६ ऑक्टोंबरपासून पाऊस सक्रीय होणार आहे. ६ ते ९ ऑक्टोंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, यंदा राज्यात १२६ टक्के पाऊस झाला आहे.
सामान्यपेक्षा जास्त पावासाचा वर्तवलेला अंदाज खरा ठरला. २०२३ मध्ये राज्यात पाऊस कमी झाला होता. तो यंदा चांगला झाला.विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला आहे. वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सून परतला आहे.
येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. यंदा मान्सूनचा परत जाण्याचा प्रवास लांबला आहे. संपूर्ण राज्यातून मान्सून परत जाण्यासाठी १० ऑक्टोंबर उजाडेल, असा अंदाज आहे.