ऑगस्ट महिन्यात इतक्या दिवस असणार बँकाना सुट्या! .

ऑगस्ट महिन्यात बँकाना बऱ्याच सुट्या असल्यामुळे कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ची बँक हॉलिडे लिस्ट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

जुलै महिना लवकरच संपत आला असून पाच दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे ऑगस्ट 2024 च्या सुरुवातीला अनेक मोठे आर्थिक बदल (नियम बदल) पाहायला मिळणार आहेत, तर रक्षाबंधन, जन्माष्टमी यांसारख्या मोठ्या सणांमुळे बँकांनाही बंपर सुट्ट्या मिळणार आहेत.

ऑगस्ट महिन्यात बँकाना बऱ्याच सुट्या असल्यामुळे कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ची बँक हॉलिडे लिस्ट पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ऑगस्टमध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांमुळे सहा दिवस सुट्या आहेत, तर देशातील विविध राज्यांमध्ये होत असलेल्या सणांमुळे बँका सात दिवस बंद राहणार आहेत.

बँक सुट्ट्यांची यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली असून ते ऑनलाइन सहज पाहता येते. ऑगस्ट महिन्यात बँकांना कोणत्या दिवशी आणि का सुटी जाहीर करण्यात आली आहे ते पाहूया.