सांगली महापालिकेत 50 लाखांच्या बिलावर बघा बोगस स्वाक्षऱ्यांचा खुलासा…..

लाख रुपयाच्या बिलावर एका ठेकेदाराने महापालिकेच्या शहर अभियंत्याची बोगस स्वाक्षरी केली आहे. बोगस स्वाक्षरी करण्यापर्यंत ठेकेदाराची गेली आहे .त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे .महापालिकेकडे तीन ते चार कामे एक मंजूर सहकारी सोसायटीला मिळाली होती. या कामाची एकूण किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे. मंजूर सोसायटीने ही कामे ठेकेदाराला दिली होती . दरम्यान बिलाची ही फाईल लेख विभागात आली .या बिलांसाठी निधीची तरतूद शिल्लक नव्हती .त्यामुळे लेखा विभागातुन ही फाईल परत शहर अभियंता कार्यालयाकडे पाठविण्यात आली.

त्यावेळी शहर अभियंता यांनी ही फाईल पाहिली, तर त्या बिलावर शहर अभियंता यांच्या नावाने केलेली सही आपली नसल्याची त्यांच्या निदर्शनास आले .शहर अभियंता याची बोगस स्वाक्षरी करून बिल लेखा विभाकडे नेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान शहर अभियंता व प्रशासनाने या बोगस स्वाक्षरी प्रकरणी गंभीर दाखल घेतली. याप्रकरणी कार्यवाही होणार, याकडे लक्ष लागणार आहे. अनेक ठेकेदारांनी या बोगस स्वाक्षरी प्रकारचा निषेध केला आहे. शहर अभियंता यांनी कायदेशीर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

बोगस स्वाक्षरी केलेला ठेकेदारांची चूक असेल तर त्या समजून देऊन एमबी व बिल जमा करून घ्यावे, दरम्यान कामाच्या बिलासाठी फाईलवर अधिकार्‍याची बोगस स्वाक्षरी करण्यापर्यंत ठेकेदारांची मंजल गेली आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर आहे यापूर्वी असे काही प्रकार घडले आहेत का, 50 लाखाची कामे झाली आहेत की ही याची तपासणी होणे गरजेचे आहे. 50 लाखाची कामे झाली आहेत ,ही केवळ कागदावर आहेत, हेही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणे आवश्यक आहे. शहर अभियंता, महापालिका प्रशासनाने त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. मंजूर सोसायटी काम न करता आन्य ठेवेदारकामार्फत काम करून घेतले असल्याची त्याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.