रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते यांचे वडील महादेव भगवान सातपुते यांचे काल 14 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवारी 16 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता स्मशानभूमी हलदहिवडी तालुका सांगोला या ठिकाणी होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. आज 1५ जानेवारी रोजी त्यांच्या घरी भेट देऊन सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट देऊन सातपुते कुटुंबाचे सांत्वन केले.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडून सातपुते कुटुंबाचे सांत्वन…
