उद्या सांगोल्यात भव्य दिव्य कार्यक्रमांनी साजरा होणार मा.आम. दीपक आबांचा वाढदिवस!

उद्या रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकनेते कार्यसम्राट पाणीदार माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यात सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या मेळाव्यातून सांगोला तालुक्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे तसेच या कार्यक्रमात माजी आमदार दीपक आबांच्या वतीने पायपीट करून शिक्षणाचे धडे गिरवीत असलेल्या गरजू आणि गरीब शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे.

तसेच निराधार महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सांगोला शहर आणि तालुक्यात हजारो महिलांना ब्लॅंकेट आणि साडी वाटप देखील करण्यात येणार आहे. अनेक गावांमध्ये हजारो लोकांना महा अन्नदान देखील करण्यात येईल.

तसेच सांगोला शहरात दीपक आबांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार व बक्षीस वितरण समारंभ रविवारी रात्री नऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच हंगीरगे तालुका सांगोला येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे.

तसेच दीपक आबांच्या वाढदिवसानिमित्त मांजरी आणि पंचक्रोशीतील जनतेला मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केलेली आहे. कडलास तालुका सांगोला येथे रविवारी म्हणजेच उद्या सात जानेवारी रोजी भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होऊन या स्पर्धा सात ते नऊ जानेवारी दरम्यान होणार आहेत.