आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लढवण्याचे निर्णयासंबंधी भूमिका जाहीर करण्यासाठी पांडुरंग परिवाराचे 6 ऑक्टोबर रोजी बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीमध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक, हे निवडणूक बाबत आपली भूमिका जाहीर करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवण्याची मागणी पांडुरंग परिवार कडून होत असल्याचे दिसत आहे .याच धरतीवर माजी आमदार प्रशांत परिचारक मालक यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात पांडुरंग परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन मते जाणून घेण्याची समजते. या घेतलेल्या बैठकामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हामध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढवली असल्याची सांगितले यामुळे आपण कोणत्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायचे असेल तर तुतारी हातामध्ये घेऊन लढवा असा आग्रह काही कार्यकर्त्यांनी केला आहे.
तर आज काही घेतलेल्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी अशी ही मागणी केल्याची दिसून येत आहे मात्र गेल्या आठवड्यात पितृ पंधरावाढा असल्यामुळे माजी आमदार प्रशांतराव परिचारक मालक यांनी कोणती भूमिका जाहीर केलेल्या नव्हती. त्यांनी पितृ पंधरावाडा संपल्यानंतर आपण आपली राजकीय भूमिका जाहीर करू असे सांगितले होते. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे .
मात्र ऐन वेळेला पक्षाने त्यांना थांबवले होते . व विद्यमान आमदार समाधान तावडे यांना उमेदवारी देऊन मदत करण्यास सांगितले होते .परंतु गेल्या काही दिवसापासून आमदार अवताडे व माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसून आले त्यामुळे परिचारक याचे कार्यकर्ते विद्यमान आमदार समाधान आवताडे, यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे दिसून येत आहे .त्यामुळे पांडुरंग परिवार उद्या ६ ऑक्टोबर रोजी बैठक घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे या बैठकीमध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक कोणती भूमिका जाहीर करणाऱ्या याकडे जिल्ह्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांसह पांडुरंग परिवारातील सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.