Solapur Crime : सोशल मीडियावरून तेढ निर्माणचा प्रयत्न

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विष्णू नगरातील दशरथ साई यांना शीतपेय उधार न दिल्याने आठ ते दहा जणांनी मारहाण केली होती. संशियिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, चौघे अटकेत आहेत.तरी, विजय क्षीरसागर व श्रीनिवास सारंगी या दोघांनी सोशल मीडियावर या भांडणासंदर्भातील आक्षेपार्ह मेसेज व्हायरल करीत जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

विष्णू नगरातील पोशम्मा मंदिरासमोरील दशरथ रामदास साई यांचे दुकान असून रविवारी (ता. १७) रात्री साडेआठच्या सुमारास आठ ते दहा जणांनी शीतपेय उधार न दिल्याने दशरथ साई यांना बेदम मारहाण केली.लोखंडी रॉड, लाकडी बांबू, दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित सहा जणांचा शोध सुरू आहे.