आटपाडीच्या देशमुखानंतर आता पाटीलही उतरणार रिंगणात……

खानापूर आटपाडी तालुक्यातील उगवते नेतृत्व यशस्वी गलाई व्यवसायिक संभाजी शेठ पाटील यांनी आटपाडी तालुक्यातून जोरदार यंत्रणा हलविण्यास सुरुवात केली आहे.

त्याचाच भाग म्हणून संभाजी शेठ पाटील यांनी आज शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी जाहीर मेळाव्याचे व कला महोत्सव 2024 चे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाजी शेठ पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील तसेच डॉ. सचिन मेधे,आयकर आयुक्त भारत सरकार उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमात राज्यस्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. ग्रुप डान्समध्ये प्रथम पारितोषिक रुपये 16000, द्वितीय क्रमांक 11000 तर तृतीय क्रमांक 7000 बक्षीस देण्यात येणार आहे. सदर रेकॉर्ड स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.

सदर कार्यक्रम बचत भवन ग्राउंड आटपाडी येथे होणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी शेठ पाटील यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता संभाजी शेठ पाटील यांनीही हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे.