माढ्यात बैलगाडा शर्यतीचा थरार, राज्यभरातून बैलगाडा चालक दाखल, अभिजीत पाटलांचं शक्तीप्रदर्शन….

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापालया सुरुवात झाली आहे. निवडणुकांच्या आधीच वातावरण निर्मितीसाठी इच्छुक उमेदवरा विविध स्पर्धांच आयोजन करत आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अभिजीत पाटील यांनी बावीत आज भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून अभिजीत पाटील यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे.  अभिजीत पाटील यांनी अलिकडच्या माढ्यात वेगवेगळ्या स्पर्धांचा धडाका लावला आहे.आज बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीसाठी राज्यभरातून बैलगाडा चालक आले आहेत. या स्पर्धेसाठी भरघोस बक्षिसांची खैरात केली जात आहे.

या स्पर्धा पाहण्यासाठी माढा पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने रसिक बावी येथे पोहोचले आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून या ओपन बैलगाडा शर्यतीला  सुरुवात झाली आहे.अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ते इच्छुक आहेत. मात्र, त्यांना तिकीट मिळेल का नाही? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. बबनदादा शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर ‘धपका पॅटर्न’ म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या अभिजीत पाटलांनी शरद पवार यांच्याशी जवळीक साधली. ऊसाला जिल्ह्यात विक्रमी दर देणारे अभिजीत पाटील कमी काळात प्रसिद्धीच्या झोतात आलेत. त्यांनी माढा मतदासंघात खेळ पैठणीचा, माढा केसरी कुस्ती स्पर्धा, दही हंडीचा कार्यक्रम या माध्यमातून वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलीय. सध्या माढा मतदारसंघातील गावोगावी त्यांचे दौरे सुरु आहेत. 

दरम्यान, एकेकाळी शरद पवारांनी संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी अभिजीत पाटील यांच्या खांद्यावर टाकली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी अभिजीत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंढरपुरात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एक कार्यक्रम देखील घेतला. त्यानंतर अभिजीर पाटील यांच्या साखर कारखान्याला मदत देखील मिळाल्याचं आपण पाहिलं. मात्र, त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय जनतेला काही पटला नाही. त्यामुळं आता शरद पवार त्यांनी विधानसभेला तिकीट देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.