दसऱ्याच्या पालखी शर्यती शांततेमध्ये पार पडतील; अॅड. सदाशिवराव पाटील यांची ग्वाही…..

विटा येथे विजयादशमीच्या दिवशी श्री रेवणसिद्ध या एकाच देवाच्या दोन पालख्यांच्या शर्यती होत असतात. या शर्यती पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून भाविक शहरात येत असतात. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहून या शर्यती शांततेत पार पडण्यासाठी विटा पोलीस व प्रशासनाच्यावतीने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी सदाशिवराव पाटील, विजय पाटील, सतीश पाटील, रणजित पाटील तसेच गुंफा येथील उमेश जंगम, जगदीश जंगम, राजेंद्र जंगम, रेवण जंगम, प्रमोद जंगम यांच्यासह दोन्ही गटांतील १५० कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या विटा येथील विजयादशमीच्या देवांच्या पालखी शर्यतीचा सोहळा शांततेत व कायदा सदाशिवराव पाटील आणि सुव्यवस्था अबाधित राहून पार पडेल. कोणताही अनुचित प्रकार घडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही श्री नाथाष्टमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी दिले.

मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी पालखी शर्यती मार्गातील सर्व अडथळे तातडीने दूर करण्यात येतील, असे सांगून शिलंगण मैदानावर स्वच्छता करणार असल्याचे बैठकीत सांगितले.

यावेळी पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांनी या पालखी शर्यती सोहळ्यात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या पद्धतीने सर्वांनी एकत्रित येऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. या बैठकीस नायब तहसीलदार डॉ. विजय साळुंखे, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे, सुरेश शितोळष, शरद पवार, रमेश बाबर, विलास कदम, पांडुरंग पवार, संदीप साखरे, विलास पाटील, दत्ता साठे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.