आष्टा येथील गंजीखाना क्षेत्र दुरुस्तीचा प्रश्न सुटणार…..

आष्टा येथील मिसळवाडीतील 228 नागरिकांचा गंजी खाना जमिनीचा प्रश्न गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून प्रलंबित आहे. क्षेत्र दुरुस्ती न झाल्याने हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

यामुळे या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत पालकमंत्री सुरेश खाडे आणि भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण माने मंडलाधिकारी लीना पाटील यांच्यासह पदाधिकारी तसेच नागरिक यांनी गंजिखाना जमिनीची पाहणी केली. नागरिकांच्या अडीअडचणी मंडळ अधिकारी लीना पाटील यांच्यासह महसूल विभागातील उच्च अधिकाऱ्यांच्या कानावर घातलेले आहेत.

त्यामुळे महसूल विभागाने या प्रश्नांबाबत दखल घेतली असून क्षेत्र दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. म्हणजेच गेली 20 ते 25 वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे.