सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक नेतेमंडळी आपापल्या परीने तयारी दाखवत आहेत. अशातच आता वित्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागेवाडी अर्थात नागनाथनगरचे सुपुत्र आणि ओबीसी समाजाचे राज्यनेते संग्राम नाना माने यांना वंचित बहुजन आघाडी कडून मोठी ऑफर आली आहे.
विटा असो किंवा सांगली असो या ठिकाणी संग्राम नाना माने यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांवरती त्यांनी कायमच आवाज उठवलेला आहे. त्यांचे कायमच प्रश्न समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीने संग्राम नाना माने यांच्या कार्याबद्दल विटा येथे बैठक आयोजित करून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वंचितच्या चिन्हावरती लढण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. वंचितच्या वरिष्ठ नेत्यांनी संग्राम नाना माने यांच्याशी उमेदवारीबद्दल चर्चा केली आहे. संग्राम नाना माने वंचित ची ऑफर स्वीकारून राजकीय खळबळ उडवणार का? संग्राम माने यांच्या भूमीकेकडे संपूर्ण खानापूर मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे.