हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर आगार अभियान राज्यभर सुरू आहे. या अभियानांतर्गत
समितीच्यावतीने सोमवारपासून सांगली जिल्ह्यातील प्रमुख आगारांची तपासणी सुरू झाली आहे. सांगली आगारासह विविध आगारांची समितीने पाहणी केली आणि मूल्यांकन केले. या अभियानांतर्गत सातारा विभाग स्वच्छता सर्वेक्षण समितीने सांगलीसह कडेगाव, कडेपूर, विटा, तासगाव आगारांची पाहणी केली. सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे, यंत्र अभियंता विकास माने, कामगार अधिकारी रेश्मा गाडेकर यांच्या समितीने ही पाहणी केली.
बसस्थानकाचे भौगोलिक स्थान, प्रवासी चढ-उतार, बसस्थानक, बसफेऱ्यांची संख्या यावरून वर्गीकरण करण्यात आले असून, अभियानांतर्गत बसेस व बसस्थानकाची स्वच्छता, मागील तपासणीनंतर झालेले बदल, नवीन प्रयोग, प्रवाशांचा सहभाग आदी निकषानुसार ही तपासणी करण्यात येत आहे. सांगली आगाराच्यावतीने आगारप्रमुख डोंगरे यांनी स्वागत केले. समिती स्थानिक सदस्य नंदू गुरव, रूपाली अडसूळ यावेळी उपस्थित
होते.