मंगळवेढ्यातील ‘त्या’ मृतांच्या कुटुंबीयांना अनिल सावंतांनी मोठा आधार देत केली आर्थिक मदत

भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी गोणेवाडी (ता.मंगळवेढा) येथील अपघातात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत आधार दिला.तुळजापूर येथे देवीची ज्योत आणायला गेल्यानंतर गोणेवाडी येथील भाविकांचा अपघात गत आठवड्यात झाला होता.यामध्ये दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते.या घटनेने गोणेवाडी गावावरच नाहीतर संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली होती. प्रदीप क्षीरसागर आणि नेताजी कराळे या दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला होता.

अनिल सावंत यांनी मृत पावलेल्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेत त्यांना आधार दिला तसेच आर्थिक मदतही केली.अनिल सावंत हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्यातून अनेकांच्या दुःखात सहभागी होताना आजपर्यंत दिसले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी आर्थिक मदतही केली आहे.