हातकणंगलेची जागा शिवसेनेचीच….

आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपलेल्या आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. अशातच प्रत्येक नेते मंडळींची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. उमेदवारी बाबतीत चर्चांना उधान देखील आलेले आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाची जागा ही हक्काची शिवसेना ठाकरे पक्षाची आहे. ती मिळणार नक्कीच शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी हातकणंगले तालुक्यातील मिनचे येथे पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळावा आणि सोशल मीडियाचा वापर यासाठी आयोजित केलेल्या समारंभात व्यक्त केले.