सांगोला येथील महाराणा प्रताप राजपूत घिसाडी समाज बांधव अतिशय कष्टाळू असून दिवसभर प्रामाणिकपणे कष्टाचे काम करून आपले कुटुंब चालवतात. या समाजाकडून आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आलेली होती. आमदार शहाजीबापू पाटील यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून 50 लाख रुपये निधी मंजूर करून आणला. त्याबद्दल या समाजाकडून आमदार शहाजी बापू पाटील यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. यावेळी महाराणा प्रताप राजपूत घिसाडी समाज बांधवांकडून आमदार शहाजीबापू पाटील यांना सदैव साथ राहील असे आश्वासन देण्यात आले.
Related Posts
सांगोल्यातील तीन ग्रामपंचायतींवर शेकापचा झेंडा
सांगोल्यातील तीन ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाने जिंकल्या आहेत. शेकापची गेली काही वर्षांपासून सुरू असलेली विजय घेडदौड कायम आहे. सांगोला तालुक्यामध्ये चिकमहूद,…
जनतेच्या आशीर्वादावरच माझा विजय निश्चित – दिपकआबा साळुंखे पाटील
महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ हटकर मंगेवाडी, जुजारपूर, गुणापाचीवाडी, बलवडी येथे…
कडलास येथे सकाळी उपोषणास सुरुवात..
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कदलास गावामध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे…