नृसिंहवाडीत वयस्कर भाविकांसाठी सुलभ दर्शन! पायरीची उंची सोयीस्कर

श्री दत्त प्रभूची राजधानी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीत येणाऱ्या वयस्कर भाविकांना श्री दत्त दर्शन घेणे आता सुलभ होणार आहे. मंदिराकडे जाणाऱ्या घाटावरील जुन्या दगडी पायऱ्यांची उंची एक ऐवजी अर्ध्या फुटाची करण्यात आली असून विजयादशमीपासून याचा वापर केला जाणार आहे.वयस्कर भाविक, महिलांना दत्त दर्शन सुलभ होणार असून येत्या १२ ऑक्टोबर रोजी दसरा महोत्सव सोहळ्यादिवशी या नवीन बांधण्यात आलेल्या दगडी पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात होणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी, सचिव संजय उर्फ सोनू पुजारी यांनी सांगितले.