शेअर बाजारात आज तेजीचं वादळ! सेन्सेक्स तसेच निफ्टीही सर्वोच्च पातळीवर उघडला

आजकाल सगळे जण हे पैसे कसे कमावता येतील याकडे लक्ष देत आहेत .देशांतर्गत शेअर बाजार रोज नवनवीन विक्रम रचतोय. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात हे सत्र सातत्यानं पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स असो, एनएसई निफ्टी किंवा बँक निफ्टी, आज सर्व ऑलटाईम हाय रेकॉर्ड लेव्हलवर खुले असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात तेजी असून सलग तिसऱ्या दिवशी बाजार विक्रमी पातळीवर उघडण्यात यशस्वी झाला आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार खरेदी करत आहेतच, पण एफआयआयचाही शेअर बाजारावर विश्वास आहे आणि ते शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.

शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ झाली असून आज BSE सेन्सेक्स 238.79 अंकांच्या म्हणजेच, 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 69,534 च्या पातळीवर उघडला. NSE चा निफ्टी 95.65 अंकांच्या म्हणजेच, 0.46 टक्क्यांच्या प्रभावी वाढीसह 20,950 च्या पातळीवर उघडला. म्हणजेच, 21000 च्या ऐतिहासिक पातळीपासून अवघ्या 50 गुणांच्या अंतरावर उघडला

अदानींच्या शेअर्सची तुफान कामगिरी 

अदानी समूहाचे शेअर्स पूर्ण वाढीसह हिरव्या रंगात व्यवहरा करत आहेत आणि सलग तिसर्‍या दिवशी हे शेअर्स जोमात व्यवहार करत आहेत. अदानी पोर्ट्स उघडल्यानंतर, NSE वर 4.50 टक्क्यांची वाढ दिसून आली आणि NSE वरच अदानी एंटरप्रायझेसमध्ये 5 टक्क्यांची मजबूत वाढ झाली. अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये सुमारे 14 टक्क्यांची बंपर वाढ दिसून आली आणि तो सध्या NSE वर 1,234.20 रुपयांवर व्यवहार करत आहे.

बँक निफ्टीमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ 

बँक निफ्टीमधील तेजीचा कल कायम राहिला आणि सुरुवातीच्या काळात विक्रमी उच्चांक दाखवला. यानंतर काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग दिसून आली. बँक निफ्टी आज 47256 वर उघडला. उघडल्यानंतर 10 मिनिटांच्या आत 47259 ची उच्च पातळी आणि 46847 ची निम्न पातळी दर्शविली. बँक निफ्टीच्या 12 पैकी 5 शेअर्स आता वाढले आहेत आणि 7 शेअर्स घसरले आहेत. त्याची सर्वाधिक लाभार्थी अजूनही IDFC फर्स्ट बँक आहे आणि त्यात 1 टक्क्यांहून अधिक वाढ आहे.