BSE सेन्सेक्सने 450 अंकांच्या उसळीसह 65,650 चा टप्पा पार केला आहे. निफ्टीही 120 अंकांच्या तेजीसह बंद झाला. बाजारात तेजी वाढवण्याचे काम आयटी आणि बँकिंग क्षेत्राने केले. निफ्टीमध्ये टायटन आणि इन्फोसिसचे शेअर्स प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. तर पॉवर ग्रीडचा शे्अर 1.25 टक्क्यांनी घसरला आहे.
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
आजच्या व्यवहारात बँकिंग ऑटो, आयटी, फायनान्शिअल सर्व्हिसेस, मीडिया, प्रायव्हेट बँक, कंझ्युमर ड्युरेबल्स, इन्फ्रा, ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स वधारले तर हेल्थकेअर, एनर्जी, मेटल, एफएमसीजी, फार्मा आणि पीएसयू बँक निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
आज बाजारात स्मॉल कॅप निर्देशांक तेजीत राहिला तर मिड कॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 6 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स वाढीसह आणि 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर ‘या’ शेअर्समध्ये घसरण
सेन्सेक्समध्ये असलेल्या 30 पैकी 24 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये लार्सन अँड टुब्रो (L&T) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.06% वाढ झाली आहे. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि मारुती सुझुकीचे शेअर्स वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सवर ‘या’ शेअर्समध्ये वाढ
सेन्सेक्समध्ये उर्वरित 6 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी पॉवर ग्रिडचा शेअर 1.21 टक्क्यांनी घसरले. याशिवाय नेस्ले इंडिया, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
