जयंत पाटील यांना मोठी संधी!

शरद पवारांकड़ून मविआची सत्ता आल्यास जयंत पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती जयंत पाटलांमध्ये आहे, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रातील सुपुत्राच्या हाती महाराष्ट्राची उभारण्याची सावरण्याची महाराष्ट्र पुढं नेण्याची जबाबजदारी टाकणार आहे. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील. शिवछत्रपती यात्रा करण्याची नोंद महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला.

शरद पवारांकडून जयंत पाटलांच्या सीएम पदाचे संकेत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काळात सर्व सहमतीने जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते की काय हे अवघ्या दीड महिन्यात स्पष्ट होईल.