अभिषेक बच्चनकडून ऐश्वर्या रायला प्रेमात धोका, घटस्फोट होणार! ‘ही’ अभिनेत्री आहे कारण?

विश्वसुंदरी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून कानावर येत आहेत. ऐश्वर्या आणि तिची मुलगी बच्चन कुटुंबासोबत राहत नसल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अंबानी कुटुंबाच्या लग्नात अमिताभ, अभिषेक, जया आणि मुलीसह पोहोचले, पण ऐश्वर्या राय तिच्या मुलीसह आराध्यासह वेगळी पोहोचल्याचं दिसलं. यानंतरच या कपलच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना हवा मिळाली. या दोघांनीही घटस्फोटाच्या बातम्यांवर कोणतंही स्पष्टीकरण मिळालं नाही, त्यामुळेच या दोघांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे.

ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंब यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात असतानाच आता एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं नात संपलं असल्याचं व्हायरल पोस्टमध्ये बोललं जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यासंदर्भातील एक पोस्ट चर्चेत आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला प्रेमात धोका दिला असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात येत आहे. अभिषेकने ऐश्वर्याला धोका दिल्याने ऐश्वर्या आणि त्याच्या नात्यात दुरावा आला असल्याचं या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

आता एक रेडिट पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की हे कपल आता वेगळं होणार आहे. अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्याला धोका दिल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. Reddit वर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये युजरने म्हटले आहे की, अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये खूप दुरावा आला आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या इतके एकमेकांपासून दिवस वेगळं राहण्याचं कारण अभिषेकने तिला प्रेमात धोका दिल्याने असल्याचे युजरने म्हटले आहे. अभिषेक बच्च्नने दसवी चित्रपटातील त्याची को-स्टार निम्रत कौर रिलेशनमध्ये राहून ऐश्वर्याला धोका दिल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.