बॉलिवूडचे ‘आशिकी’ आणि ‘आशिकी 2’ हे दोन्ही सिनेमे सुपर डुपर हिट ठरले. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशिकीमध्ये अभिनेता राहुल रॉय, अनु अग्रवाल आणि दीपक तिजोरी मुख्य भूमिकेत होते.
तर 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’ मध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मध्यवर्ती भूमिकेत झळकले. या दोन्ही सिनेमांतील गाणी एव्हरग्रीन ठरली. त्यानंतर आता प्रेक्षक मोठ्या आतुरतेने ‘आशिकी 3’ची वाट पाहत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात ‘तू मेरी आशिकी है..’ हे गाणे ऐकू येत आहे. ज्यावरून हा व्हिडीओ ‘आशिकी 3’चा फर्स्ट लूक असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘आशिकी 3’ या सिनेमाची वाट पाहत आहेत. अशात व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत अभिनेता कार्तिक आर्यन दिसतोय. त्याचा अवतार पाहून नायक प्रेमात आकंठ बुडाला आहे, हे समजणे अवघड नाही. तर कार्तिकसोबत या व्हिडिओत ‘पुष्पा 2’ फेम किस्सीक गर्ल अर्थात अभिनेत्री श्रीलीला झळकतेय.