सलमान खानला दहशत बसवण्यासाठी बाबा सिद्दीकींची हत्या?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत बिश्नोई गँगाचा हात असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी याविषयीचा खुलासा केला आहे. या हत्येच्या तपासात बिश्नोई गँग असल्याचे समोर आले आहे. शूटर्सच्या जबाबानंतर पोलीस या निष्कर्षावर पोहचली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे, सलमान खान याच्यावर दहशत बसवणे हाच उद्देश असल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलीस आता त्यादृष्टीने तपास करत आहेत. सलमान खान याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत लाँरेन्स बिश्नोईचा हात असल्याचे समोर येत आहे. बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. अटक करण्यात आलेले शूटर्स, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबई पोलीस, दिल्ली पोलिसांचे विशेष पथक, हरियाणा सीआयए आणि युपी एसटीएफ या सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या सर्व यंत्रणा एकमेकांच्या संपर्कात आल्या आहेत. पकडण्यात आलेल्या दोन्ही शूटर्सची माहिती देण्यात आली आहे.

बाबा सिद्दीकी आणि सलमान खान हे अगदी घनिष्ठ मित्र आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येतून सलमान खान याला थेट संदेश देण्याचा प्रयत्न तर करण्यात आला नाही. त्याला घाबरवण्यासाठी हा प्रकार तर करण्यात आला नाही ना? यादृष्टीने पोलीस तपास करत आहे. हत्येनंतर सलमान खान उशीरा रात्री लीलावती रुग्णालयात पोहचला. त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. सलमान खान हा पूर्वीपासूनच बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. आता बाब सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलीस सर्वच बाजूने तपास करत आहेत. सलमान खान याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्या घराबाहेर बिश्नोई गँगच्या शूटरने फायरिंग केल्याची घटना घडली होती.