महागाई पुन्हा वाढू लागली आहे. आधी दूध महाग झाले, नंतर टोलचे दर वाढले आणि आता फळे आणि भाज्या महाग झाल्या आहे. गेल्या महिनाभरात स्वयंपाकघराशी संबंधित वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत असून सर्वसामान्यांना याचा फटका बसला आहे.खाद्यतेल असो, कांदा असो की टोमॅटो, सर्वांच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीन तेल असो की मोहरी, सर्वांच्या भावात महिनाभरात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तेल, कांदा, टोमॅटो महागल्याने डाळ फ्राय, पराठे बनवणे किंवा कोशिंबीर खाणेही महाग झाले आहे. महिनाभरात तेलाच्या दरात 15 टक्क्यांनी मोठी वाढ झाली असून, कांदा आणि टोमॅटोच्या दरानेही 50 रुपये किलोचा टप्पा ओलांडला आहे. इतकेच नाही तर सर्वसामान्यांची दैनंदिन गरज असलेल्या बटाट्याच्या दरातही वाढ झाली आहे.CMIE च्या मते, फळे आणि भाज्यांच्या महागाई दरात सुमारे दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे फळांची महागाई एप्रिलमधील 3.5 टक्क्यांवरून मे महिन्यात 5.5 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. गेल्या महिन्यात फळांच्या किमतीत 2.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.