कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर अपघात! जीवितहानी नाही

मित्रांनो आजकाल एक्सीडेंट चे प्रमाण खूपच वाढलेले आहे. दररोज अनेक भागात अपघात झालेल्या बातम्या आपल्या काणी पडतच असतात. असाच अपघात कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर घडला. कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गावर घोडके मळ्यानजीक अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्ता सोडून बाजूला गेल्याने उलटली. मोटारीत चालकासह चार ते पाचजण प्रवास करत होते.सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र मोटारीचे नुकसान झाले आहे. हे सर्वजण आजऱ्याहून पुण्याला जात होते. राज्यमार्गावर बाजूपट्ट्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे दुतर्फा डांबरीकरणासाठी खडी पसरली आहे.

पहाटे दाट धुके व अंधारामुळे चालकाच्या निदर्शनास खडी आली नाही. त्यावरून मोटार घसरून शंभर ते दीडशे फूट खोल खाली जाऊन उलटली. येथून जाणाऱ्या कळंबा ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी मोटारीचे दरवाजे उघडून प्रवाशांना बाहेर काढले.

मोटारीतील किरकोळ जखमी झालेल्यांना नागरिकांच्या सहकार्याने खासगी वाहनातून उपचारासाठी नेले. क्रेनच्या साह्याने उलटलेली मोटार बाहेर काढली. हा राज्यमार्ग धोकादायक असून पाच वर्षांत चाळीसहून अधिक जणांचा बळी गेला. तसेच शंभरहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. येथे महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात करण्याची गरज आहे.

बाजूपट्ट्याचे डांबरीकरण सुरू आहे. मात्र खबरदारीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणती उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे वाहन घसरून दररोज एक-दोन अपघात होत आहेत. त्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी लोखंडी बॅरॅकेट्स लावणे गरजेचे आहे.