मा. जयंत पाटील गटाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

कारंदवाडी येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांनी भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख निशिकांत भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी व माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे यांचा भाजपा व स्थानिक विकास आघाडीने दारुण पराभव करत सत्ता काबीज केली होती. हा पराभव आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात होता. आता स्वतःच्या पक्षातीलच प्रमुख पदाधिकारी यांनी थेट निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पक्ष प्रवेश केल्याने हा दुसरा धक्का मानला जात आहे.