इस्लामपूर येथे राष्ट्रवादी असंघटीत बांधकाम कामगार शरदचंद्र पवार पक्षाच्या वाळवा तालुका, इस्लामपूर शहर व आष्टा शहराच्या वतीने दोन हजार कष्टकरी कुटुंबांना भांडी संच वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महायुती सरकार निशाना साधला. विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून राज्य सरकारने राज्यातील मतदारांसाठी लोकप्रिय घोषणा जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे.
लाडकी बहीण’ योजनेपाठोपाठ आता ‘लाडका भाऊ’ योजनेचीघोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका झाल्याकडे कानाडोळा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आषाढी एकादशीचे औचित्य साधून लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. यावरून आता महायुती सरकारवर विरोधकांकडून पुन्हा टीका होत आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महायुती सरकारला खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणाबाजी करत असून येत्या दोन- तीन महिन्यांत चंद्र-तारे देवू म्हणतील, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला.