शहरातील सांगोला चौकात भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा शनिवारी पहाटे अचानक बसवण्यात आला आहे. आंबेडकर प्रेमींनी चौकात असलेल्या लोखंडी खांबा शेजारी चबुतर रचून त्यावर पुतळा बसवल्याची माहिती प्रशासन व पोलिसांना नव्हती. आंबेडकरप्रेमींनी बसल्यानंतर पुष्पहार घालून अभिवंदन केले, याची माहिती पोलीस व प्रशासनाला मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरिक्षक, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. शासनाचे अधिकृत परवानगी घेऊन पुतळा कार्यकत्यांनी बसवावा अशी विनंती केली. परंतु कार्यकर्त्यांनी बसवलेल्या पुतळा काढण्यास तीव्र विरोध केला.
पुतळा बसवलेल्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे संबोधले जाते. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, शिक्षक नेते यु. टी. जाधव, रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रविण सुर्यवंशी, चंद्रकांत दौडे, विनायक पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, भारत पाटील, अरूण वाघमारे यांच्यासह आटपाडी तालुक्यातील विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.