आष्ट्यातील रस्त्यांसाठी खासदार धैर्यशील माने यांचा निधी

आष्टा शहरातील विविध विकास कामांसाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. गणपती चौक, तेली गल्ली, कासार गल्ली, ज्योतिर्लिंग चौक परिसरातील अनेक नागरिकांची या रस्त्यांचे डांबरीकरण व्हावी अशी मागणी होती.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आष्टा येथील गणपती चौक ते ज्योतिर्लिंग रस्ता डांबरीकरणासाठी 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी दिली.

या परिसरातील नागरिकांच्या देखरेखीखाली या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम केले जाईल दर्जा आणि गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नसल्याचे वीर कुदळे यांनी म्हटले आहे.