हातकणंगले विधानसभा निवडणुकीत भाजपकडून भास्कर शेट्टे यांच्या नावाची जोरदार चर्चा

गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा ही व्यक्ती केली, होती त्याचबरोबर त्यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी निवडणुकी संदर्भात चर्चा केली असून पक्षाने आपल्याला उमेदवार दिल्यास नक्कीच हे सर्वजण आपल्या पाठीशी राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भास्कर शेटे हे मूळचे बुवाचे वाठार येथील रहिवासी असून सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून शरद पवार यांच्या माध्यमातून वडगाव विधानसभेची निवडणूक लढवली होती.

भास्कर शेटे यांनी आपल्या राजकीय संपर्काच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे विकास कामे करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहे. तर नाही विधानसभा मतदारसंघात त्यांचा चांगला परिचय असून वरिष्ठ पातळीवर असणाऱ्या नेत्यांच्या संपर्कामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्यास नक्कीच पक्षाचा फायदा होईल असे मत अनेक मतदारसंघातील युवकांच्यातून व्यक्त होत आहे. परिणामी भाजप गोटातून सध्या उचल्या उमेदवाराला उमेदवारी नको तर स्थानिकचा उमेदवार द्यावा अशी ही मागणी बऱ्याचशाच युवक कार्यकर्त्यांच्यातून होत असून, तसे घडल्यास स्थानिक चा उमेदवार म्हणून भास्कर शेटे यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

परिणामी आपण हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे मत भास्कर शेट्टे यांनी बोलताना व्यक्त केली असून त्या संदर्भात तालुक्यातील सर्व नेत्यांच्या गाठीभेटीवर त्यांनी जोर दिला आहे. त्यांना सर्व ठिकाणी चांगल्या प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.