प्रत्येकाची पसंती हि वेगवेगळी असते. अनेक मनोरंजन कार्यक्रम आपणाला टीवीवर पहायला मिळतात. तर असाच बिग बॉस हा एक शो आहे. बिग बॉस १७ या कार्यक्रमासह यातील स्पर्धकदेखील चांगलेच चर्चेत आहेत. ‘बिग बॉस 17’मध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पती विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली असून ती वारंवार एक्स बॉयफ्रेंड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य करत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता आपलं वैयक्तिक आयुष्य, रिलेशनशिप, सुशांत सिंह साजपूत अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत चर्चेत येत आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत सात वर्षे रिलेशनमध्ये होते. पण नंतर त्यांचं बिनसलं आणि त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अंकिता विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. पण आता ‘बिग बॉस’च्या घरात तिला वारंवार सुशांत सिंह राजपूतची आठवण येत आहे.
अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत
‘बिग बॉस’च्या घरात अभिषेक कुमार (Abhishek Kumar) अंकिता लोखंडेला बॉलिवूडमध्ये पदार्पण कसं करायचं याबद्दल विचारतो. त्यावेळी अंकिता त्याला मेहनत करण्याचा सल्ला देते. अंकिता म्हणाली,”सुशांत सिंह राजपूतकडून मेहनत कशी करायची हे शिकण्यासारखं आहे. माझा सुशांतच्या मेहनतीवर विश्वास होता. अनेक लोक त्याची मजा घ्यायचे पण मी मात्र कायमच त्याला पाठिंबा दिला आहे”.
अंकिता लोखंडे पुढे म्हणाली,”सुशांत प्रामाणिकपणे चांगलं काम करेल, यावर कायमच माझा विश्वास होता. आम्हा दोघांमध्ये एक स्ट्राँग बॉन्ड होता. त्यामुळे एकमेकांना पाठिंबा देण्यात आम्ही पुढे होतो. पण पुढे गोष्टी बदलल्या. ‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाच्या प्रोसेसदरम्यान त्यानी घेतलेली मेहनत मी पाहिलीआ आहे. प्रत्येक दिवशी तो क्रिकेट खेळायचा. दिवसभर क्रिकेटच्या मैदानातच असायचा”.
सुशांत सिंह राजपूतचा मला अभिमान : अंकिता लोखंडे
सुशांत एम.एस. धोनीचं शूटिंग करत होता त्यावेळी मी रांचीमध्ये होते. आम्ही एमएस घोनी यांच्या घरी गेलो होतो. सुशांतकडे एक डायरी होती. या डायरीत त्याला काय करायचं आहे हे तो लिहित असे. डायरीत लिहिलेल्या सर्व गोष्टी त्याने पूर्ण केल्या आहेत. सुशांतने कधी माझा वापर केला नाही. सुशांत आणि माझा ब्रेकअप झाल्यानंतर आमचं नातं पुन्हा आधीसारखं होईल असं मला वाटत होतं. पण तसं काही झालं नाही”.