‘चिकनी चमेली’वर जिनिलीया-रितेशचा जबरदस्त डान्स

जिनिलीया आणि रितेश देशमुखची जोडी ही बॉलीवूडमध्ये तसेच सोशल मीडियावर सर्वांना आवडणारी जोडी आहे. हे दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.ते एकमेकांसोबतचे फोटो आणि रील्स,व्हिडीओ सतत सोशल मीडियावर आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतात. चाहत्यांना सुद्धा त्यांचे व्हिडीओ पाहायला आवडतात. महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनीच्या एका व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

नुकताच या दोघांनी आपल्या मित्रमंडळींसह एका गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.रितेश-जिनिलीया त्यांचे डान्सचे व्हिडीओ नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. काही दिवसांपासून शूटिंगनिमित्त रितेश परदेशात होता. कतरिना कैफचं ‘चिकनी चमेली’ या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे, आजही हे गाणं लागलं पाय आपोआप थिरकायला लागतात.

रितेश-जिनिलीयाने आपल्या मित्रमंडळींसोबतच याच ‘चिकनी चमेली’ गाण्यावर भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.गाण्याच्या व्हिडीओमध्ये रितेश-जिनिलीयासोबत जेनिफर विंगेट, कांची कौल, आशिष चौधरी, शब्बीर अहलूवालिया, मुश्ताक शेख, समिता बांगर्गी हे सगळे कलाकार जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला जिनिलीयाने ” यु अँड अस फॉरेव्हर”, “फनटाईम” असे कॅप्शन दिले आहेत.