पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी शरद पवार यांची खास रणनीती

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपमध्ये तिकिटासाठी प्रचंड स्पर्धा असून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे आव्हान असणार आहे. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यावेळी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर करून मोहिते पाटील यांना बंडखोरीच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून दिला होता. तो धोका लक्षात घेऊन भाजपकडून पंढरपूरची उमेदवारी सर्वात उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, शरद पवार यांनीही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी खास रणनीती आखली आहे. भाजपचा कोणता मासा गळाला लागतो, याकडे यावर मतदारसंघाच्या उमेदवारीचे गणित ठरण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचा धडा लक्षात घेऊन बहुधा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच भाजप या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करू शकतो.