BCCI कडून T20 WC टीममधील खेळाडूला मोठा झटका, 12 वर्षांपासून टीमचा भाग, सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये अन्याय का?

BCCI ने 2025-26 च्या सीजनसाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टची घोषणा केली आहे. यात स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेलचं नाव सुद्धा आहे. पण यावेळी अक्षर पटेलला डिमोशनचा सामना करावा लागलाय. त्यावरुन सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात वादविवाद सुरु आहेत. अक्षर पटेल तिन्ही फॉर्मेटचा प्लेयर आहे. टी 20 टीमचा व्हाइस कॅप्टन आहे. त्याशिवाय तो टीममधला एक सीनियर खेळाडू आहे. अशावेळी बीसीसीआयचा हा निर्णय फॅन्सना अजिबात आवडलेला नाही.

अक्षर पटेलचं नाव मागच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ग्रेड बी मध्ये होतं. पण नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याला डिमोट करुन ग्रेड सी मध्ये टाकण्यात आलय. वर्ष 2024-25 च्या सेशनमध्ये अक्षर पटेल एकही टेस्ट मॅच खेळला नाही. म्हणूनच त्याला ग्रेड बी मधून ग्रेड सी मध्ये डिमोट करण्यात आलं असावं. त्याशिवाय तो वनडे आणि टी 20 सुद्धा कमी खेळलाय. त्यामुळे त्याची ग्रेड बदलण्यात आली असावी.

ग्रेड घटवणं हे समजण्यापलीकडे आहे

अक्षर पटेलची ग्रेड घटवण्यात आल्यामुळे त्याचे फॅन्स आणि काही क्रिकेट पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘अक्षर पटेलच्या जे हक्काचं आहे, ते सर्व मिळवण्यासाठी त्याला अजून काय करावं लागेल?’ असं आकाश चोपडाने एक्स हँडलवर म्हटलय. आकाश चोपडा प्रमाणेच अनेक क्रिकेट फॅन्सनीही असेच प्रश्न उपस्थित केलेत. अक्षर पटेल सारख्या महत्वाच्या खेळाडूची ग्रेड घटवणं हे समजण्यापलीकडे आहे असं एका युजरने लिहिलय.
आंतरराष्ट्रीय डेब्यु करुन 12 वर्ष झाली

अक्षर पटेलला आंतरराष्ट्रीय डेब्यु करुन 12 वर्ष झाली आहेत. या दरम्यान तो 15 टेस्ट, 71 वनडे आणि 88 T20I सामने खेळला आहे. या सर्व फॉर्मेटमध्ये मिळून त्याने 2200 पेक्षा जास्त धावा आणि 200 पेक्षा जास्त विकेट घेतलेत.